---Advertisement---

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Follow Us:
---Advertisement---

सातारा : तारळी धरणासह पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी अनेक गावातील घरे, दुकानात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली.

तालुक्यातील पाल येथील पूर परिस्थितीची पाहणी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!