बेवारस भिक्षुक मरणानंतरही कुणाची देणेकरी राहिली नाही ! लहुजी शक्ती सेना व रॉबीनहुड आर्मीने केले अंत्यसंस्कार
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.२५ : बुधवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारी एका बेवारस महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यु झाल्याचे उघडकीस आले. या महिले जवळ भिक्षा मागुन साठविलेल्या रक्कमेतुन तीचा अंत्यसंस्कार लहुजी शक्ती सेना जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष वसंत देडे व रॉबीन हुड आर्मीचे सदस्यांनी केला.
मरणानंतरही त्या भिक्षुक महिलेला अंत्यसंस्काराकरिता कुणाचीही ती देणेकरी म्हणुन राहिली नाही. जीवनामध्ये चढउतार येतात, काहीना उतारवयात सांभाळ करणारे कोणच नसतात. तेव्हा असे अनाथ लोक वृध्दा अवस्थेमध्ये मंदिराजवळ भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. बुधवार पेठ समाधी मठ जवळ अशीच एक बेवारस महिला शनिवारी सकाळी मृत झाल्याचे आढळले.
ही महिला समाधी मठ अक्कलकोट येथे भीक्षा मागून आपला उदरनि्वाह चालवित होती . या अनाथ महिलेवर अंत्यसंस्कार कोण व खर्चही कोण करणार हा प्रश्न होता. याकरिता सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन माणुसकी जागृत केली . मयत महिलेने भिक्षा मागून साठवलेल्या ५ हजार ६०० रुपयेतून तीच्यावर अंत्यसंस्कार खर्च, करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या महिलेवर अंत्यसंस्कार करताना लहुजी शक्ती सेना जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष वसंत देडे, व रॉबिन हूड आर्मीचे रशिद खिस्तके, विक्रांत आळळोळी , राम लोणारी, आकाश अळ्ळोळी, गोटू गवंडी, अनिल किलजे यांनी अंत्यसंस्कारसाठी सर्व व्यवस्था केली. अनाथ मृत महिलेला जागेवरून उचलण्यापासुन तिला सरणावर ठेऊन अग्नी देण्यापर्यतचा सारा विधी वसंत देडेसह रॉबीनहुड आर्मी सदस्यांनी करून संवेदना हरपुन बसलेल्या समाजाला जागृत करुन माणुसकी जिवंत असल्याचे दाखवुन दिले आहे. त्या बेवारस आजीच्या त्याच्या राहिलेल्या पैशातून रोबिन हूडआर्मी मार्फत पुन्हा गरीब लोकांना अन्नदान करण्यात आले.