---Advertisement---

बारावीचा निकाल 99.63 टक्के; राज्यातील 46 विद्यार्थ्यांना मिळाले 100 पैकी शंभर टक्के गुण, 6, 542 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आले. बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 2.7 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये 6 ह्जार 542 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यातील 46 विद्यार्थ्यांना 100 पैकी शंभर टक्के गुण तर 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1372 आहे. 91,430 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

आज दुपारी 4 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.

■ विभाग निहाय निकाल
★ कोकण विभाग – 99.81
★ मुंबई विभाग – 99.79
★ पुणे विभाग – 99.75
★ नाशिक – 99.61
★ कोल्हापूर – 99.76
★ अमरावती  – 99.73
★ लातूर  – 99.65
★ औरंगाबाद –  99.34

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!