अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यातील अवैध हातभट्टी दारू साठ्यावर मंगळवारी दुपारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून अवैध हातभट्टी दारू पकडली.
शशिकांत निलु राठोडच्या पत्रा शेडच्या बाजूला तीन रबरी ट्यूब प्रत्येकी ४५ लिटर प्रमाणे ६७५० रुपये किंमतीचे एकूण १३५ लिटर अवैध हातभट्टी दारू व शंकर हरिश्चंद्र राठोडच्या शेतातील बांधावर ३ प्लास्टिक पिंप त्यात प्रत्येकी २०० लिटर गूळ मिश्रित रसायने असे एकूण ६०० लिटर गूळमिश्रीत रसायन प्लॅटिक पिंप सह १९५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केले आहे. या घटनेची फिर्याद पो. कॉ. गजानन गायकवाड व प्रमोद शिंपाळे यांनी दिली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, पोसइ पुजारी, प्रमोद शिंपाळे, गजानन गायकवाड, चिदानंद उपाध्ये, सीताराम राऊत यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. ह. महादेव चिंचोळकर हे करीत आहेत.