---Advertisement---

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर घातपाताचा प्रयत्न, “या” राज्यातुन एक ग्रेनेड जप्त

Follow Us:
---Advertisement---

अमृतसर :  भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पाकिस्तानकडुन घातपाताचा प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमधील अमृतसरच्या रणजीत अॅव्हेन्यू या पॉश भागातून एक ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.

स्वच्छता विभागाच्या एका कर्मचाऱ्याने ग्रेनेड बघून स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने ग्रेनेड निकामी केला. पाकिस्तान ड्रोनद्वारे भारतात स्फोटके पाठवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. यामुळे पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. ग्रेनेड रणजीत अॅव्हेन्यूमध्ये कसा आला याची चौकशी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी अमृतसरमधून आयईडी लावलेला टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आला होता. आता अमृतसरमधून ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंजाबच्या डीजीपींनी राज्याच्या पाकिस्तान सीमेजवळच्या सर्व भागांतील पोलिसांना हायअलर्ट दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!