बारामती येथे सरपंचांच्या निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरुवात, गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांचा सहभाग
अक्कलकोट, दि.१८ : नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे चार दिवसीय निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. या शिबिरातून सरपंचांना विविध योजनांची माहिती मिळणार आहे.
या शिबिरात अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांनी सहभाग घेतला असून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. याठिकाणी आलेल्या सरपंचांना राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, सर्व सरपंचांना योग्य आणि मुद्देसूद मार्गदर्शन, सर्व योजनांची माहिती, योगअभ्यास, आमदार फंड, खासदार फंड, जिल्हा परिषद मधील सर्व योजना,ग्राम विकास मंत्रालया मधील सर्व योजनेची माहिती या प्रशिक्षणामधून मिळत आहे, असे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितले.
या उपक्रमात राज्य ग्रामीण विकास
संस्था यशदा पुणे संचालक यांचे योगदान असून जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त सरपंचांनी प्रशिक्षणास न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच परिषदेच्या जिल्हा सरचिटणीस वनिता सुरवसे यांनी केले आहे.