---Advertisement---

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनील बंडगर यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अक्कलकोटचे सुनील बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर तसेच पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजितकुमार पाटील व सोलापूर जिल्हा प्रभारी रणजीत सुळ यांचा हस्ते त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले.
पक्षाने आतापर्यंत जी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. यापुढे देखील पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडून पक्षवाढीला चालना देण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही बंडगर यांनी यावेळी दिली.

यावेळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष सुरेश गुत्तेदार, मोहोळचे प्रभारी अभिमान काळे, रासपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय माडकर, सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजरुके, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमंत हक्के, अक्कलकोट विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष शिंदे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अनिता घोडके, रेवणसिध्द शेरी, नागनाथ हजारे, परमेश्वर पुजारी, बाळासाहेब दाईंगडे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!