मुंबई, दि.२२ : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत केंद्र सरकारने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा आणखी दहा टक्क्यांनी वाढवली आहे.याबाबतच्या निर्णयावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. याची अधिसूचना केंद्रीय विधी मंत्रालयाने जारी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो,
हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने आयोगाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने
हा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी यापूर्वी 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा होती.या निर्णयामुळे ती वाढवून 77 लाख रुपये होणार आहे तर विधानसभेसाठी देखील याच पद्धतीचा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाचे राजकीय पक्षाने स्वागत केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.