---Advertisement---

अपत्य प्राप्तीसाठी मित्रानेच आपल्या मित्राच्या मुलाची गळाचिरुन केली हत्या, पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापुर : अपत्य प्राप्तीसाठी विकृत मनाच्या मित्राने आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली आहे. वरद रवींद्र पाटील वय ७, रा. सोनाळी, ता. कागल असे या निष्पाप मुलाचे नाव आहे.

दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वरदच्या वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचे समोर आली आहे. यानंतर सोनाळीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मृत बालक वरदच्या अंगावर जखमांचे व्रण आहेत. त्यामुळे अमानुष मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला असावा तसेच यामागे नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे कागल तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!