---Advertisement---

संजय राऊतांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल असे म्हणाले होते कि, पाठीत खंजीर खुपसला अस म्हंटल कि राज्यातील जनतेसमोर एकच चेहरा दिसत होता. आता पाठीत खंजीर खुपसला अस म्हंटले कि दोन चेहरे दिसतात असे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता म्हणाले होते. त्याला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, की अशा प्रकारच्या वक्तव्यांकदे ‘दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत.  देशात पहिल्या पाचमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे,  हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे.  शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार करत नाहीत. बाळासाहेबांचापासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी ते केले नाही.  बंद दाराआड काय झालं होतं,  आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले,  या चर्चेत आता आम्ही जात नाही. महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे’.  असे संजय राऊत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!