---Advertisement---

किणीमोड येथील अवैध दारू आड्यावर पोलिसांचा छापा

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्यावर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन मोठ्या प्रमाणात सापडून आले आहे. ही कारवाई दि ४ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने किणीमोड तांड्यावर विनापरवाना हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन प्लास्टिक पिंपात भरलेले व भट्टीचे साहित्य आढळून आले असून त्याची अंदाजे किंमत ५५, ५९० रुपये आहे. सदर अवैध व्यवसाय राजू गोपु चव्हाण रा किणीमोड तांडा ता अक्कलकोट याचे असून तो फरार आहे.या गुन्ह्याची फिर्याद पो कॉ गजानन गायकवाड यांनी दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहे. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी
पोलीस हवालदार विपीन सुरवसे, प्रमोद शिंपाळे, सीताराम राऊत, नामदेव माने,गजानन गायकवाड यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!