ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बसेसना पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

 

अक्कलकोट,दि.१७ : राज्य शासनाकडून कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यात बसेसना शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे.

 

राज्य शासनाच्या निर्णयानुसार २० ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाने परवानगी दिली होती. त्यानुसार राज्य परिवहन विभागाच्या अनेक विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र राज्य शासनाकडून कर्नाटक आणि गुजरात राज्यात शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर महामंडळाच्यावतीने वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदरची वाहतूक करताना काही अटी घालण्यात आलेले आहेत. यामध्ये बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करून मार्गस्थ करण्यात याव्यात, लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बससाठी एकाच आसनावर एक प्रवाशी झेड पद्धतीने आरक्षण उपलब्ध करून द्यावे, तथापि पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरू होत असल्याने सर्वांनी पूर्ववतप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा सूचना करण्यात आले आहेत.सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात यावे, त्यानुसार नियत व फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या महाव्यवस्थापक यांनी विविध विभागांना दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!