---Advertisement---

स्वराज्य ध्वज यात्रेचे उद्या अक्कलकोट शहरात आगमन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२१ : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज या यात्रेचे आगमन उद्या दुपारी ४ वाजता अक्कलकोट शहरामध्ये होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी दिली. ही स्वराज्य ध्वज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध ७४ महत्त्वाच्या धार्मिक, अध्यात्मिक, गडकिल्ले, स्मारके, संतपीठ, शौर्य पिठाच्या ठिकाणी त्याचे पूजन केले जात आहे. तीर्थक्षेत्र तसेच धार्मिक स्थळाच्या ठिकाणी ही यात्रा पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत या यात्रेचे जोरदार स्वागत होणार आहे. या ध्वजाचे पूजन श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे होणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सुरवसे, तालुका उपाध्यक्ष शिवराज स्वामी, युवानेते अविराज सिद्धे, मुन्ना राठोड, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार ,सरचिटणीस शंकर व्हनमाने, स्वामीनाथ चौगुले, बंटी पाटील, विक्रांत पिसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!