---Advertisement---

बोरी नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश, तहसीलदार सिरसट यांनी केली सांगवी बु जलाशयाची पाहणी

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट दि.२६ : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावपातळीवरील स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगावी.गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे व त्यांना निवारा, लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश तहसीलदार शिरसट यांनी स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. रविवारी सायंकाळी कुरनूर धरणात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रात्रीपासून २४०० क्यूसेक पाणी खाली सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठोकाठ भरुन वाहत आहे. सांगवी बु, बोरीउमरगे यासह बोरी नदीकाठच्या सर्व गावांना तहसीलदार
भेटी देत आहेत.सध्या बोरी कुरनूर धरणातून २४०० क्यूसेक्स इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून यात आणखी पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. वेळोवेळी स्थानिक पातळीवरील सर्व प्रशासनाचे कर्मचारी माहिती देत राहतील तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी ही सतर्क राहावे व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी दक्षता घ्यावी,
असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!