---Advertisement---

अभाविपकडून लोकशाही बळकट करण्याचे काम; अक्कलकोट तालुक्यात नव मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.२६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून देशभरामध्ये लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अभाविप अक्कलकोट शाखेच्यावतीने शहरामध्ये नव मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.या मोहिमेचा प्रारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी,नगरसेवक महेश हिंडोळे, अभाविपचे शहराध्यक्ष शरणय्या मसूती, शहरमंत्री प्रसन्न गवंडी यांच्या उपस्थितीत पार पडला. अभाविप हे अभियान शहरांमधील विविध भागात राबविणार असल्याचे माहिती शहराध्यक्ष शरणय्या मसूती यांनी प्रास्ताविकात दिली.
अक्कलकोट शहरातील नागरिकांनी या मतदार नोंदणी अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एक नव मतदार म्हणून येणाऱ्या काळात आपल्या शहरासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे अधिकार प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन महेश हिंडोळे यांनी केले.यावेळी अभियान प्रमुख केदार हिंगमिरे, महेश स्वामी, प्रज्वल अंजुटगी, प्रशांत गवंडी, सिद्धाराम मंगरूळे, रोहन राठोड, चिन्मय इचगे, समर्थ महामुनी, पवन बिराजदार, समर्थ स्वामी, इरसंगय्या स्वामी, आशिष पडणुरे, समर्थ बाळीकई, आकाश बाळीकई, बंटी स्वामी, ओंकार वाघमारे, धनराज स्वामी तसेच अभाविपचे पूर्व कार्यकर्ते,शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!