ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित सुरू करा, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन

अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या चार दिवसात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज तहसीलदारांकडे करण्यात आली.

यामध्ये अतिवृष्टी व बोरी नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तहसीलदार शिरसट यांना निवेदन देण्यात आले. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे उसासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तातडीने याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, पंचनामे सुरू करावेत, असे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष शिवराज पोमाजी, वसीम कुरेशी, राहुल मोरे, सरपंच सिद्धाप्पा कोटी, सरपंच कुपेंद्रा अरेनवरू, संदीप नवले, शिवशरण इचगे, मुदस्सर शेख, महादेव करमल आदी युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!