सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, मा.विभागीय उपआयुक्त श्री. प्रसाद सुर्वे सो तसेच मा. श्री. नितिन धार्मीक अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या पथकाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क माळशिरस व पंढरपूर विभाग यांचे समवेत कटफळ गावचे हददीत, आटपाडी –पंढरपूर रोडच्या डाव्या बाजूस, हॉटेल किनारा समोर, ता.सांगोला जि. सोलापूर या ठिकाणी छापा मारुन गोवा राज्य निर्मीत इंम्पीरीयल ब्लू व्हिस्की 750 मि.ली. क्षमतेच्या 900 सिलबंद बाटल्या (75 बॉक्स), इंम्पीरीयल ब्लू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 23904 सिलबंद बाटल्या (498 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या 540 सिलबंद बाटल्या तसेच टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा सहा चाकी ट्रक क्र. MH14 – EM 4495 व इतर साहीत्य असा एकुण अंदाजे किंमत रु. 56,29,975/- इतक्या किंमतीचा मुददेमाल गुन्हा रजि.क्र. 380/2021 मध्ये जप्त करण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये ज्ञानेश्वर अशोक भोसले, वय 31 वर्षे, रा. पोखरापूर, ता.मोहोळ, जि. सोलापूर यास अटक करण्यात आलेली आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक श्री.दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक श्री.संजय बोधे, श्री. शहाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. ,प्रविण पुसावळे, गणेश सुळे व जवान स्टाफ श्री. प्रताप कदम, अमर कांबळे,अहमद शेख, भरत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात व तानाजी जाधव यांनी सहभाग घेतला.