---Advertisement---

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट !

By team
On: March 10, 2026 5:08 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या बंधू आणि नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाती मृत्यूवर चर्चा केली.

या भेटीत रोहित पवार यांनी काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह काही इतर नेत्यांशीही या घटनेच्या गंभीरतेवर चर्चा केली. यावेळी सर्व नेत्यांनी या अपघाताबाबत आपली तीव्र चिंता व्यक्त करत, अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सामान्य घटनेतून झाला की घातपाताचा भाग होता, याबाबत काही राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदांना संबोधित करून हा अपघात संशयास्पद असल्याचे सांगितले आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटद्वारे सांगितले की, “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत दिल्लीत अनेक खासदारांना भेटून चर्चा करत असताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  यांचीही भेट झाली. काल झालेल्या भेटीची माहिती खरगे साहेबांनी सोनिया गांधी यांना दिली. हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांना थोडक्यात समजावून सांगितले.”

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, “या दुर्घटनेबाबत सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व नेते नक्कीच सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे.” राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या अपघाताच्या परिस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चेला या भेटीमुळे नवा आयाम मिळाला आहे. रोहित पवार आता वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी भेटी घेऊन ही घटना सामाजिक व राजकीय दृष्ट्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!