ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्तर प्रदेशातील ‘त्या ‘घटनेचा अक्कलकोट युवक काँग्रेसकडून निषेध, तहसीलदार शिरसट यांना निवेदन

अक्कलकोट : उत्तरप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या आंदोलक शेतक-यांना वाहनाद्वारे चिरडून हत्या केल्याच्या निषेधार्थ व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजाबदार वर्तनाविरोधात आज अक्कलकोट येथील तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना अक्कलकोट युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले आणि या दोन्ही घटनेबद्दल निषेध नोंदवण्यात आला.

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकाबंळे, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर ,नगरसेवक विकास मोरे यांच्या उपस्थितीत संबधीत गुन्हेगारवर तत्काळ कारवाई करावी व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्याबरोबर गैरवर्तन केलेल्या संबधीत व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी हे निवेदन देण्यात आले.

यावेळी शहर युवक अध्यक्ष मुबारक कोरबु,बसवराज अलोळी, शिवशरण ईचगे,अयाज चंदनवाले,राहुल मोरे,अभिजीत अडवितोटे,फारूख बबरची,संदिप नवले,सुनिल ईसापुरे,महादेव करमल,महादेव चुंगी,गुरू म्हेत्रे,राहुल भकरे,सिद्धु म्हेत्रे उपस्थित होते.काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार व केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या प्रारंभी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलक शेतकऱ्याला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!