---Advertisement---

जोरदार पावसाने गळोरगी साठवण तलाव तुडुंब भरला, प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गळोरगी साठवण तलाव तुडूंब भरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात हे एक महत्वाचे तलाव आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसाने ते तुडंब भरले आहे.

यामुळे वरूण राजाची कृतज्ञता व्यक्त करत पुजा करण्याची संधी गळोरगी ग्रामस्थांकडून प्रथमेश म्हेत्रे यांना देण्यात आली. या भेटीदरम्यान त्यांनी तलावाची पाहणी करत तेथील समस्यांचा आढावा घेतला. आणि त्या दुर करण्यात यावे यासाठी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकारी फोनवरून विनंती केली.

यावेळी सभापती आनंद सोनकाबंळे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील,  नगरसेवक सद्दाम शेरीकर, माजी सैनिक बसवराज पाटील, भीमाशंकर अजुरे, भीमशा जमादार, खंडु हरवाळकर, सिद्धाराम बिराजदार ,जगदीश हळगोदे, दस्तगीर जमादार, रमेश चव्हाण, महादेव चुंगी, राहुल मोरे , राहुल भकरे,  महादेव करमल,  विष्णु यळमेली यांच्यासह जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!