ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोषण अभियानाचा कुंभारीत समारोप ; माता- बालकांना सुदृढ करण्यासाठी सकस पौष्टिक आहार महत्त्वाचा : स्वामी

कुंभारी : बालके ही राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यांच्याबरोबरच मातांना सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी सकस व पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. यासाठी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले.

माता-बालके सदृढ राहावीत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पोषण अभियान राबविले असून याचा समारोप कुंभारी येथे स्वामी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे होते.

यावेळी अण्णाराव बाराचारे ,जावेद शेख, शिरीष पाटील ,श्रुती निकंबे, वैशाली होनराव, ऋषिकेश जाधव, सहदेव ढेपे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर ढाकणे यांनी केले तर डॉ.अनुराधा सोनकांबळे यांनी स्वागत केले. राष्ट्रीय पोषण अभियानामुळे कुपोषणमुक्तीला हातभार लागणार असून यासाठी अंगणवाडी सेविका आणि घराघरात पोषणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी केले.

यावेळी कुंभारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी महिनाभर कुंभारी येथील विविधा अंगणवाडी केंद्रात पोषण महिना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आला. त्याला पालक आणि मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे सीईओ स्वामी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!