---Advertisement---

दिर्घ कालावधीनंतर स्वामीं दर्शनाने आनंदित झालो –  न्यायमंत्री मुंडे

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.८ ऑक्टोबर – श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे मी व माझे कुटुंबीय निस्सिम भक्त आहेत कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्याने स्वामींचे दर्शन घेता येत नसल्याचे खंत मनात होते. काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर तातडीने आज अक्कलकोटला येऊन सहकुटुंब श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन पावन झालो असून स्वामींच्या दर्शनाने आनंदित झालो असल्याचे मनोगत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले, ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सहकुटुंब येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर वरील भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी  सौ.व.श्री. धनंजय मुंडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचीत सन्मान केला.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, मंदार महाराज पुजारी, दिलीप भाऊ सिद्धे, मनोज निकम, प्रकाश सुरवसे, शिवकुमार स्वामी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, बंटी पाटील, सिद्धाराम जाधव, माणिक बिराजदार इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!