मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आज मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी तर एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर मुंबई हायकोर्टाने आर्यन खान बरोबर मुंनमून धमेचा, अरबाज मर्चंटला जामीन मंजूर केला.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान गेल्या पंधरा दिवसापासून एनसीबीच्या कोठडीत होता.आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांना जामिन मिळणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्या नंतर आर्यन खान, मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट यांना जामीन मंजूर करण्यात आला.
न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी ते आज तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर उद्या शुक्रवारी अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील असे सूत्रांनी सांगितले आहे.