अक्कलकोट- देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरते. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती झटणार असल्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.
आचेगांव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सच्या १११११ साखर पोत्यांचे पुजन मंगळवेढ्याचे उद्योजक वैभव नागणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यासमयी उस्मानाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, अक्कलकोटचे उद्योजक अभिनंदन गांधी,मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, कार्यकारी संचालक मोहन पिसे,शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे,विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलताना गणेश माने देशमुख म्हणाले की, जयहिंद परिवाराने नेहमीच शेतकरी व सामाजिक हित जोपासले आहे. दुष्काळनिवारणासाठी जलसंधारणाची कामे,पाणीपुरवठा,गणेशोत्सव व नवरात्रीच्या माध्यमातुन समाजातील सर्व घटकांसोबत विविध उपक्रम, जयहिंद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जात बिल अदा केले आहेत.याचेच फलित म्हणून यावर्षी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जयहिंदला मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा सुरू केला आहे.
जयहिंदने विश्वास कमविला-विशाल नन्ना(शेतकरी,चपळगाव)
जयहिंदने नेहमीच हिताचे कार्य केले आहे.ऊसाचे बिल वेळेत अदा केल्याने शेतकरी आर्थकदुष्ट्या सक्षम होत आहेत.जयहिंदने शेतकऱ्यांमध्ये विश्वास प्राप्त केल्याने यावर्षी पूर्ण क्षमतेने जयहिंदचे गाळप सुरू आहे.कारखाना परिसरात ऊसाच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर उभ्या आहेत.