ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोशल मीडियातील अग्रेसर अॅेप फेसबुकने केला आपल्या नावात बदल, यापुढे फेसबुक “या” नावाने ओळखलं जाणार

न्युयार्क : सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने आपले नाव बदलले आहे. गुरुवारी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केली. आता जगभरात फेसबुक ‘META’ नावाने ओळखले जाणार आहे. अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची चर्चा सुरु आहे. अखेर नाव बदलण्याची प्रक्रिया संपली आहे. फेसबुकला ‘META’ असे नाव दिले आहे.

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.

‘मेटाव्हर्स’ हा शब्द तीन दशकांपूर्वी एका डिस्टोपियन कादंबरीत वापरला गेला होता. मात्र, सध्या हा शब्द सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. डिजिटल जगात आभासी आणि परस्परसंवादी संबंध स्पष्ट करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मेटाव्हर्स हे खरं तर एक आभासी जग आहे. जिथे माणूस शारीरिकदृष्ट्या नसला तरीही अस्तित्वात असले. यासाठी आभासी वास्तवाचा वापर केला जातो.

मार्क झुकेरबर्गला त्याच्या सोशल मीडिया कंपनीचे रिब्रॅंडिंग करायचे होते. या कंपनीला पूर्णपणे वेगळी ओळख द्यायची होती. फेसबुकला फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून पाहिले जात नाही. आता त्याच दिशेने वाटचाल करत फेसबुकचे नाव बदलून ‘META’ करण्यात आले आहे. कंपनीचे लक्ष आता एक मेटाव्हर्स तयार करण्यावर आहे, ज्याद्वारे एक आभासी जग सुरू केले जाऊ शकते. जिथे कम्युनिकेशन आणि ट्रांसफरसाठी वेगवेगळी साधने वापरली जाऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!