ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 टक्के वाढ; मागील तिमाहिच्या नफ्यात 331 कोटीची भर

सोलापूर : बँकींग सोबत सामाजिक हित जोपासणारी देशातील अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँक असलेली बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 ट्न्नयाने वाढ झाल्याची माहिती बँकेचे कार्यपाल निर्देशक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अतनु कुमार दास यांनी दिली.

बँक ऑफ इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी यंदाच्या वित्तीय वर्षातील दुसरा तिमाही ताळेबंद जाहिर केला असून या तिमाहिमध्ये 1051 कोटी रूपये इतका निव्वळ नफा बँकेने कमावला आहे. चालू वर्षातील निव्वळ नफा 1770 कोटी इतका झाला आहे असून बँकेचा व्यवसाय मिश्र 10,31,856 कोटी झाला आहे. एकूण ठेवी 6,12,961 कोटी इत्नया झाल्या आहेत. तर एकूण ऋण 4,18,895 कोटी वितरीत झाले आहे. निव्वळ व्याज उत्पन्न 12 ट्ने वाढून 3523 कोटी झाले आहे.

या बरोबरच थकीत कर्जारांच्या संख्येत 15 टक्के घट झाली असून बचत तसेच चालू ठेवींप्रमाणे 43 टक्के पर्यत वाढलेले आहेत. मोबाईल बँकींग आणि इंटरनेट बँकींगचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या 24 लाखाने वाढून 1 कोटी 30 लाखापर्यत गेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर व्यवसाय पुर्ववत झाला असून बँकेचे ग्राहक, कर्जदार, खातेदार आणि हितचिंतक यांना दिलासा देणारी परिस्थिती बँकेने निर्माण केली आहे. बँकेचे कर्मचारी, अधिकारी यांचे परिश्रम आणि सर्व खातेदार, हितचिंतक यांनी निर्माण केलेला विश्वास यामुळेच हे श्नय झाले असल्याचेही यावेळी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अतनु कुमार दास यांनी व्यक्त केले.

बँक ऑफ इंडिया ही बँकींग सोबतच सामाजिक हित जोपासण्याचेही काम करते त्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!