---Advertisement---

“या” प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आरोप

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.  इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवलं. नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

अत्यंत गंभीर आरोप करत आहे मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर, जेव्हा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ म्हणजेच जवळपास एक वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही.

८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे.

८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडले गेले. १४ कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात ८ लाख ८० हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, १४ कोटी ५६ लाख पकडले गेले आणि ८ लाख ८० हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं. पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात. या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांत जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही. प्रकरणाचा तपास होत नाही. याचं कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचं संरक्षण होतं असे आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!