ध्यास विश्वसार्ह बातमीचा

त्या घड्याळांची किंमत नेमकी किती? हार्दिक पांड्याने केला ट्विटरच्या माध्यमातुन खुलासा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलु खेळाडु हार्दिक पांड्या सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर त्याच्याकडून पाच कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. नयूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. दरम्यान, त्याने ट्विट करत या संदर्भात खुलासा केला आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचे हार्दीक पांड्याने म्हंटले आहे.

या दोन घड्याळांची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे असे सांगण्यात येत होतं. हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे. या सर्वांवर हार्दिकने ट्विट करुन माहीती दिली आहे.

हार्दिकने ट्विट अस म्हंटलय कि, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दुबईहून मुंबईला पोहोचल्यावर, मी दुबईहून आणलेल्या मालाचे कस्टम ड्युटी भरण्यासाठी विमानतळावरील कस्टम काउंटरवर गेलो. सोशल मीडियावर माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. मी देशाचा कायदा पाळणारा नागरिक आहे. आणि सरकारच्या सर्व यंत्रणांचा आदर करतो. मला मुंबई सीमाशुल्क विभागाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे आणि मी दुबईहून आणलेल्या मालाचे मूल्यांकन आणि बिल आणि सर्व कागदपत्रे यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. असे त्याने ट्विट करत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

विमानतळावर उपस्थित असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांना मी स्वतः सर्व सामानाची माहिती दिली आहे. तसेच, कस्टम विभागाने माझ्याकडे सर्व कागदपत्रे मागितली. सध्या ते योग्य कर्तव्याचे मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार आहे आणि सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत ५ कोटी सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. अशी स्पष्टीकरण हार्दिक पांड्याने ट्विटरच्या मध्यमातुन दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!