ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटी आंदोलनामुळे आतापर्यंत महामंडळाला २५० ते ३०० कोटींच्या आसपास नुकसान; निलंबित कर्मचार्यांची संख्या २७७६ वर

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज ११ वा दिवस असून, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काल आंदोलनाचा १० वा दिवस असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचा दशक्रिया विधी देखील केला होता.

दरम्यान एसटी आंदोलनामुळे आतापर्यंत महामंडळाला २५० ते ३०० कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे मात्र सरकार अधिक कठोर होत आहे. काल एसटीतील २३८ कर्मचार्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत निलंबित कर्मचार्यां ची संख्या २७७६ इतकी झाली. आतापर्यंत ४० हुन अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

एकीकडे एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे विलीनीकरण सध्या स्थितीला शक्य नसल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. परिवहन मंत्री अनिल परबही म्हणाले की, याबाबत चर्चा करुनच निर्णय घेता येईल, सरसकट निर्णय घेता येणे शक्य नाही. त्यामुळे हा संप आणखीन चिघळला जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!