गुंतवणूकरांसाठी शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’ ; टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपतीत झाली मोठी घट
मुंबई : गुंतवणूकरांसाठी गेला शुक्रवार जणू ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला आहे. टायटन कंपनीचा शेअर काही टक्क्यांनी पड्ल्यांने राकेश झुनझुनवाला यांचा मोठं नुकसान झाला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे शेअर बाजार सतत कोसळत असतानाच शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात झुनझुनवाला यांचा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ७५३ कोटींचं नुकसान झाली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
शेअर बाजारातील घसरणीचा फटका फक्त राकेश झुनझुनवालांनाच नाही बसला. अनेक छोट्या-बड्या गंतवणूकरांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सर्व गुंतवणूकदारांचं मिळून जवळपास १६ हजार कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे ही घसरण थांबणार की कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे ही घसरण आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपतीतही मोठी घट झाली आहे. प्रतिशेअर १७४ रुपये म्हणजेच जवळपास ७ टक्क्यांनी आठवडाभरात घसरण झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची भागिदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे साधारणपणे साडेचार टक्के शेअर आहेत. प्रतिशेअर १७४ रुपयांचं नुकसान झाल्यानं झुनझुनवालांना एकूण ७५३ कोटींचा फटका बसला आहे.