ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खाकी वर्दीतील ‘देव’ माणुस म्हणजेच पोलीस उपअधीक्षक डॉ. संतोष गायकवाड साहेब

डॉ. संतोष गायकवाड (पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी) यांची सोलापूर शहर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणुन बदली झाल्यानिमित्ताने दोन शब्द….. !

सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक तथा अक्कलकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपासून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, सर,कर्मचारी यांच्या अडीअडचणी विषयी अतिशय संवेदनशील होते.सरांकडे कर्मचारी यांच्या विरोधात अनेक तक्रारी अर्ज असायचे पण साहेब डॉक्टर असल्याने ज्या कर्मचारी यांना ऍडमिट आणि इंजेक्शनची गरज असतानाही फक्त ‘साधी गोळी’ देऊनच कित्येक कर्मचारी यांचे दुखणे बरे केले आहेत किंबहुना प्रत्यक्ष त्या गोष्टीचे स्वतः खात्री करून कर्मचारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे…

आज सरांची बदली झाली, आता सरांचा आजपासून सहवास कामाच्या माध्यमातून लाभणार नाही,काम करताना मिळणारी एक प्रकारची ‘ऊर्जा ‘ ती ऊर्जा आता मिळणार नाही हे ‘सांगण्यासाठी’ माझी ही सारी उठाठेव.. साहेब म्हणजे खाकी वर्दीच्या मागे ‘अतिशय संवेदनशील’ दडलेले व्यक्तिमत्त्व, साहेबांच्यामध्ये असणारे धर्मनिरपेक्ष,निःपक्षपातीपणा त्याचबरोबर जबरदस्त निर्णयक्षमता, आणि कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे उत्तम कौशल्य यांचे योग्य संगम म्हणजेच सर,

साहेब गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय खडतर नक्षलग्रस्त भागात जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलो पावली जोखीम घेऊन आपले कर्तव्य अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे पार पाडले बाबत गतवर्षीच पालकमंत्री यांच्या हस्ते ‘विशेष सेवा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. ही सर्व बाब आम्हा पोलीस प्रशासनासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गणेशोत्सव सुरू होण्याअगोदर आपण अक्कलकोटमध्ये रूजू झालात आणि आपला श्रीगणेशा ‘श्रीगणेशाच्या महत्वाच्या बंदोबस्ताने सुरू झाला.आम्ही पाहिले की, ‘अनंत चतुर्थी’ शेवटच्या मिरवणूक दिवशी मिरवणूक मार्गाचा ३ किमी अंतराचा मार्ग आपण सर्व गणपती विसर्जन होइपर्यंत १० ते १२ वेळा पुर्ण मार्ग पायी चालुन वेळेत संपविण्यासाठी गणेश मंडळ सोबतच राहिलात.

अक्कलकोट शहरातील पहिलाच आणि अतिशय महत्त्वाचा बंदोबस्त काहीही अनुचित प्रकार होऊ न देता अतिशय शांततेत आणि वेळेत पार पाडलात.इथेच आपल्यातील नेतृत्व गुणांची चुणुक आपल्या कर्तव्यातून सर्वानाच प्रकर्षाने जाणवली.गणेशोत्सव संपतोच लगेच एक महिन्यानंतर अतिशय महत्त्वाच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेली विधानसभा निवडणुक सुरू झाली.

ही निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने आपली कसोटीच होती कारण निवडणुकीत फटकेबाजी करून चालत नव्हते तर यात वाईट चेंडूलाच सीमापार करणे,आणि चांगल्या चेंडूला खेळून सारणे हेच गोष्ट आपण ‘ प्रतिबंधक कारवाई ‘ च्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे केली आणि योग्य पोलीस बंदोबस्त आणि कायद्याची योग्य अंमलबजावणी केल्याने तालुक्यात साधा एक सुद्धा किरकोळ गुन्हा दाखल होऊ न देता, निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडून पोलीस खात्यातील एक सक्षम अधिकारी असल्याची ओळख फक्त तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला झाली हे अक्कलकोट विधानसभा निवडणुकीचे ‘ विशेष’. निवडणूक संपली आणि सण, उत्सव बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपतोच जगावर आलेले सर्वात मोठे महामारीचे कोरोनाचे ‘महासंकट’ समोर येऊन उभारले. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्व जनता घरात आणि आपली यंत्रणा मात्र रस्त्यावर आपण सकाळी सात वाजता रस्त्यावर उभे राहून लॉकडाऊनच्या काळात शासन व प्रशासन यांची अंमलबजावणी ग्राउंडस्तरावर राबवून सर्व सामान्य यांच्या नजरेत पोलीस दलाची प्रतिमा आणि पोलीस दलाबाबत चांगली भुमिका निर्माण करून पारदर्शक काम पोलीस यांच्याकडून झाले पाहिजे ही भावना सर्व पोलीस अंमलदार यांच्यात रुजवुन अतिशय जोखीम पत्करून खुपच आव्हानात्मक काम आपण अक्कलकोटच्या जनतेसाठी सुरक्षेबाबत इमाने इतबारे काम करीत राहिलात यातच आपली प्रतिमा आणि पोलीस यांच्या विषयी ‘विश्वासहर्ता आणि पोलीस दलाबाबतची चांगली भावना निर्माण करण्यास आपली भूमिका खुपच महत्वाची ठरली हेसुध्दा आज खासकरून मनापासून सांगावे वाटते.पोलीस अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणुन घेऊन योग्य न्याय आणि विश्वास देण्याचे काम या मागील दोन वर्षात बऱ्याच कर्मचारी याने पाहिले,यामुळेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आपलेबद्दलची आपलेपणाची भावना अधिकच घट्ट होत गेली आणि आपण सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ‘गळ्यातील ताईत’.होऊन गेलात.खाकी वर्दीतील देवमाणुस आपल्या निमित्ताने आम्हास मिळालात ह्याच आपल्या व्यक्तिमत्त्व बद्दल पोलीस अंमलदार यांच्या प्रतिक्रिया गडद होत गेल्या हेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष.सर आपण आता सोलापूरला हजर व्हाल, सर आपली उणीव नक्कीच आम्हा सर्वांना जाणवेल,आपली कारकीर्द अक्कलकोट शहरासाठी आणि तालुक्यासाठी खूपच कौतुकास्पद ठरली अशीच कारकीर्द सोलापूर शहरात होईल यात शंकाच नाही.

सर, आपल्याकडून अशीच सेवा निरंतर घडत जावो.याकरिता आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ आपणास उदंड, निरोगी, दीर्घायुष्य, देवो ह्याच मनापासून खुप खुप शुभेच्छा.

पो. ना.धनराज शिंदे (गोपनीय)
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!