---Advertisement---

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला परिवहन मंत्री अनिल परबांवर “हा” आरोप

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्यावर कारवाईचा करीत आहे. मात्र  कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्यापही संप मागे घेतला नाही.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कीपरिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे आरोप अनेकवेळा केले. मात्र तीन आठवड्यांचा कालावधी गेल्या नंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी परिवहन मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत. त्याचा आम्ही विरोध व निषेध करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांचा संप न मिटवता तो आणखी चिघळवून विविध शहरांतल्या करोडोंच्या जमीनी विकण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा डाव असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

ज्या पद्धतीने मुंबई मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडो रुपयांच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब यांचा दिसतोय, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!