ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन -जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे; सोलापूर मार्केटकमेटीत हमाल तोलारांचे पगार वेळेत करण्याची मागणी

पंढरपूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीने आडती व व्यापार्‍यांनी प्रत्येक 5 तारखेला हमाली व तोलाई न दिल्यास कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायतचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले. ते सोलापूर जिल्हा समन्वय समितीची सोलापूर मार्केट कमेटीमध्ये स्थानिक हमाल, तोलार कामगारांची बैठकीत बोलत होते.

यावेळी सोलापूर मार्केट कमेटीचे सचिव सी.आर.बिराजदार, सह.सचिव दत्तात्रय सुर्यवंशी, कामगार प्रतिनिधी शिवानंद पुजारी, समन्वय समितीचे भिमा सिताफळे, दत्ता मुरूमकर, गपार चाँदा, सिध्दू हिप्परगी, गुरूशांत पुराणीक, शिवलिंग शिवपुरे, राजाभाऊ दणाणे, विशाल ढेपे, महेंद्र चंदनशिवे, नागनाथ खंडागळे, नागनाथ खरात, शिवकुमार कोळी, दत्ता शिवशरण, हब्बू जमादार, विशाल मस्के, महिला कामगार प्रतिनिधी सुनिता रोटे व भाभी तसेच सर्व हमाल तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शिवाजी शिंदे म्हणाले की, हमाल तोलार कामगाराने प्रथम आपला भरणा रोख न घेता तो माथाडी बोर्डाकडे भरला पाहिजे. जो कोणी आडती किंवा व्यापारी भरणार भरण्यास विलंब करीत असल्यास त्या आडती व व्यापार्‍याविरोधात मार्केट कमेटी व माथाडी बोर्डात पत्र देवून त्या व्यापारी व अडत्यास आपला भरणा भरण्यास भाग पाडावे. मार्केट कमेटीने याकडे स्वत: जातीने लक्ष देवून रोख पगार देणारे आडते, व्यापारी व रोख पगार घेणारे हमाल व तोलार कामगार यांच्यावर लक्ष द्यावे. तसेच जे आडत व्यापारी कामगारांना जाणूबूजून पगार देत नाहीत, भरणा वेळेवर करीत नाहीत, बिगर लायन्सचे कामगारांची संख्याज्यास्त असल्याचे समजते यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा सोलापूर मार्केट कमेटीत बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिला.

यावेळी मार्केट कमेटीचे सहसचिव दत्तात्रय सुरवसे म्हणाले की, हमाल तोलार कामगारांनी रोख पगार घेऊ नये, जे आडत व्यापारी पगार देत नाहीत त्यांच्यावर योग्यती कारवाई मार्केट कमेटीचे संचालमंडळ करतील यात शंकाच नाही. यावेळी अनेक हमाल तोलारांनी आपल्या समस्या मांडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!