सोलापूर, दि.५ : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या ९० व्या वाढदिवस निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या सोलापुरातील निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वनसाधना करुण सोलापुरच्या मायभूमीत कायमच्या वास्तव्याला आले आहेत तिथली सारी जंगले त्यांनी पायाखाली घातली. त्यातले पक्षी, प्राणी, वृक्ष या साऱ्यांमध्ये दडलेलं एक अद्भूत जगणं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. त्यांनी तब्बल एक लाख नव्या शब्दांचं योगदान दिलंय. त्यांचा पक्षीकोश, प्राणीकोश, वृक्षकोश यापूर्वी प्रसिद्ध झालाय. मत्स्यकोशाचे काम सुरू आहे. ही सारी कामे प्रचंड धडपडीची आणि भावी पिढ्यांसाठी अत्यंत मोलाची आहेत. २००६ साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही होते.
आयुष्यातली कित्येक दशके जंगलात वनसाधना करणाऱ्या, जंगल प्रत्यक्ष जगलेला या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज त्यांच्या यशवंत सुत मिल कंपाउंड येथील निवासस्थानी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी वाढदिवस निमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या वनसाधनेचा, वनअभ्यास कार्याचा गौरव केला.
यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, जेष्ठ नेते दत्ता सुरवसे, जे जे कुलकर्णी, मारुती कटकधोंड, श्रीनिवास चितमपल्ली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.