अक्कलकोट पालिकेची आगामी निवडणूक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची : म्हेत्रे, २ कोटी २५ लाख रुपयेच्या विकास कामाचे भूमिपूजन
अक्कलकोट : अक्कलकोट नगरपालिकेची आगामी निवडणूक शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली तर निश्चित यश मिळेल, असा विश्वास माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला. अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये २ कोटी २५ लाख रुपयेच्या विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यात आरक्षण १९ अ आठवडा बाजार येथे शॉपिंग सेंटरसाठी १ कोटी ५२ लाख व मंगरुळे पेट्रोल पंप ते विकास हॉटेल काँक्रीट रस्त्यासाठी ७५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, अक्कलकोट शहरात आगामी काळात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या माध्यमातूनच आपण निवडणूक लढवूया. सर्वजण एकत्रित बसून सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहूया. अक्कलकोट शहरात अनेक विकास कामे अजून बाकी आहेत. ते पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहूया. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहेत. त्यामुळे जनतेने आमच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन केले.
नगराध्यक्ष शोभाताई खेडगी यांच्या माध्यमातून अक्कलकोट शहरात अनेक चांगली विकास कामे झाले असून त्यांनी कधीही पक्ष भेदभाव केला नाही, असेही म्हेत्रे यावेळी यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा शोभा खेडगी, पंचायत समिती सभापती आनंदराव सोनकांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, नगरसेविका नसरीन बागवान, शिवराज स्वामी, सलीम यळसंगी, बाबासाहेब पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, अकिल बागवान, सरफराज शेख, माया जाधव, माणिक बिराजदार, शयबाज बागवान, सत्तार बागवान, अस्लम बागवान, जमादार आदी उपस्थित होते.