---Advertisement---

“उद्धव ठाकरे यांचा धर्मांतर विरोधी कायद्याला पाठिंबा; विरोधी पक्ष नेते नाहीत, सरकार घाबरत का?”

By team
On: March 16, 2026 5:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आपले मत मांडले आणि धर्मांतर विरोधी कायद्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, राज्य व केंद्रात गेल्या काही वर्षांत भाजपने सत्तेत असतानाही बळजबरीने किंवा फसवून धर्मांतर झाले असल्यास, त्याची जबाबदारी कोणाची आहे हे स्पष्ट केले पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “नेमके कोणत्या समाजात, कोणत्या विभागात धर्मांतर होत आहे, याची माहिती मिळाली तर आम्ही सावध राहू शकतो. आमचे कार्यकर्ते तिथे तत्पर राहतील. बळजबरीने कोणी धर्मांतर करत असेल तर आम्ही त्याचा विरोध करू.”

विरोधी पक्ष नेतेच्या अनुपस्थितीवर बोलताना ठाकरे म्हणाले, “इतिहासात आम्ही पहिल्यांदाच असे पाहत आहोत की दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. सरकार का घाबरत आहे? आम्ही अनेक वेळा विनंती केली, पण अद्याप निर्णय नाही. सगळे एकतर्फे कारभार सुरू असल्याची हीच उदाहरणे आहेत.”

बेळगावमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काही मराठी तरुणांनी महाराष्ट्र गीत वाजवले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. याबाबत ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा. कोणत्याही सरकार असो, मराठी माणसांवर जोरजबरदस्ती करणे, भाषा लादणे किंवा धर्मांतर होणे – याला आम्ही विरोध करतो. केंद्र सरकारने देखील यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.”

उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य राज्यातील सत्तेवर असलेल्या धोरणांवर टीका आणि धर्म, भाषा व संस्कृतीच्या बाबतीत स्थिर भूमिका व्यक्त करणारे ठरले आहे. त्यांच्या भाषणातून शिवसेना पक्षाच्या धार्मिक व सांस्कृतिक मुद्द्यांवरील स्पष्ट दृष्टिकोनाची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!