भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर येथे ६ जानेवारीला विविध कार्यक्रम; भास्करराव पेरे पाटील यांचे होणार व्याख्यान
अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने येत्या ६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती के.बी.प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते ४ या वेळेत हन्नुर येथील महादेव देवालयात सिध्देश्वर ब्लड बँक व आश्विनी ब्लड बॅकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.याच कार्यक्रमात स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे तर गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या असणार आहेत.
यावेळी सभापती अॅड.आनंद सोनकांबळे, जि. प. सदस्य शिवानंद पाटील, जि.प सदस्य आनंद तानवडे, मल्लिकार्जुन पाटील, संजय देशमुख, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव, अश्पाक बळोरगी, नन्हेगावचे सरपंच सिध्दार्थ गायकवाड,पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, दिलीप बिराजदार,धनेश अचलारे, अश्पाक अगसापुरे, तुकाराम बिराजदार, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील, अशोक पाटील,गुरुराज माळगे, विलास पाटील आदींची उपस्थिती असणार आहे.याप्रसंगी महाप्रसादाची व्यवस्था असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
सायंकाळी सहा वाजता वेदमूर्ती मृगेंद्रशास्त्री उमराणी यांचे प्रवचन होणार आहे. तर रात्री ८ वाजता राष्ट्रपतीपदक विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामविकास कसा होणार ? या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यावेळी डॉ. नेहा भरमशेट्टी, राजकुमार भरमशेट्टी, बसवराज सुतार,चंद्रकांत जंगले, नरेंद्र जंगले, अप्पाशा हताळे ,निरंजन हेगडे, सुरेश हेगडे, शब्बीर जमादार, वैभव भरमशेट्टी, रमेश छत्रे, प्रवीण हताळे, महादेव बंदिछोडे, श्रीकांत भकरे, विशाल भरमशेट्टी, किरण हेगडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.