---Advertisement---

वटवृक्ष स्वामींच्या गाभाऱ्याचे होणार दुरूस्तीकरण, दुरुस्ती काळात भाविकांना ज्योतिबा मंडपात स्वामी दर्शनाची व्यवस्था

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.४ – श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गर्भ गाभाऱ्याच्या आतील भाग व गाभारा  मंडपातील परिसर मार्बलीकरणाने बदल करून दुरूस्तीकरण करण्यात येणार आहे. दुरूस्ती करणाचे काम पूर्ण होईपर्यंत भाविकांना स्वामी दर्शनाची व्यवस्था वटवृक्ष मंदिरातीलच ज्योतिबा मंडपात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या परिसरात भाविकांच्या सोयीकरिता अनेक बदल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या मूळ गाभाऱ्यातील परिसरात मार्बलीकरणचे काम करण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण होईपर्यंत येणाऱ्या स्वामीभक्तांना स्वामींचे दर्शन सुलभतेने व्हावे याकरिता स्वामी दर्शनाची व्यवस्था देवस्थान परिसरातीलच ज्योतिबा मंडपात करण्यात आले असल्याचे सांगितले. भाविकांनीही सदर काम पूर्ण होईपर्यंत मंदिर समितीच्या व्यवस्थेनुसार स्वामी दर्शन घेऊन मंदिर समितीस सहकार्य करावे असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!