---Advertisement---

उमरजीकर यांच्या बिग बी दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – बीग बी यांचे सोलापूरचे फॅन प्रदिप उमरजीकर यांनी तयार केलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित पद्मविभूषण महानायक अमिताभ बच्चन यांच्या २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन सोलापूर आकाशवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी हस्ते करण्यात आले. सर्व प्रथम स्वामी समर्थींच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन दासरी सरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पदमाकर कुलकर्णी ,दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानायक अमिताभ बच्चन यांची भेट न झाल्याने व दूरध्वनीवरुन उमरजीकर सरांनी संवाद साधून त्यांच्या सहमतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी सरांनी केले.

प्रदिप उमरजीकर, छायाताई उमरजीकर,शिरीष उमरजीकर,अथर्व उमरजीकर, खंडेराव कडबाने, शशिकांत वसंतपुरे,रमेश शेट्टी, दत्ता खैरमोडे, अश्पाक मुच्छाले, एपोरा टेलर, राजू नवले,साहिल नदाफ,भिमाशंकर आलुरे, मल्लेश शावणकर,रवी म्हेत्रे, राजू पेद्दी,मेघराज कल्लावाले, मल्लिनाथ कोळी, गुलाब तांबोळी, भाऊ वलेकर, गोपी धायगुडे, सतीश होनराव, अमोल पवार, सिध्दाराम बावगे,मल्लिनाथ कारकल,निंगप्पा हिपळे, सोमाजी राऊत,बसवराज हतुरे,प्रशांत कोकरे, सिध्दाराम हिपळे, सचिन वाघमारे आदी डॉन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!