ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती; कुरनूर येथील किर्तन सोहळ्यात औसेकर महाराजांचे प्रतिपादन

मारुती बावडे

अक्कलकोट : कलियुगामध्ये हरी नामाचा यज्ञ हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने  मोक्ष प्राप्ती होते, असे प्रतिपादन  श्री संत सद्गुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व. प्रकाश पाटील यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. ह.भ. प. आबा महाराज कुरनूरकर व पाटील परिवाराने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराजांनी मुखी नाम हाती मोक्ष,ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी ! या श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या चार चरणाच्या अभंगावर कीर्तन केले. कृतयुग, द्वापार युग व त्रेतायुग या तिन्हीची वैशिष्ट त्यांनी सांगितली. पण यात कलियुग हे कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सांगताना या कलियुगामध्ये नाम घेत असताना माणसाला अंतरिक साधनेवरच कसा भर द्यावा लागतो.

माणसाला बुद्धी स्थिर करावी लागते, मन स्थिर करावे लागते, भगवंताचे नामस्मरण अखंड घ्यावे लागते, नामस्मरण घ्यायला वयाची मर्यादा नाही, जातीची आडकाठी नाही व कुठेही कसाही स्नानाच्या आधी किंवा स्नानाच्या नंतर नामस्मरण घेता येते.नामाचे पवित्र एवढे मोठे आहे की त्याला कसल्याच प्रकारचे बंधन नाही.नाम सर्व जीवाला सर्व संकटातून मुक्त करणारे असे नाव आहे.अखंड नामस्मरणामध्ये संसाराच्या आणि परमार्थाच्या अवस्थेमध्ये खूप फरक असतो संसारात एखाद्या वेळेस मनुष्य दरिद्र असतो पण पारमार्थिक दृष्ट्या तो अत्यंत श्रीमंत असतो.पारमार्थिक दृष्ट्या ही श्रीमंती कधीही कुठल्याही स्थळे ना संपणारी आहे. म्हणून नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण घेत जावे,

सुरुवातीला जरी आपले अनुसंधान लागले
नाही तरी नामातच इतकी ताकत आहे की आपण अखंड नामस्मरण करत गेलो तर
भगवान आपल्याला अनुसंधान आपोआप
लावत असतात म्हणून भगवंताचे नामस्मरण आपण सदैव करावे,असे त्यांनी सांगितले.

या कीर्तन सोहळ्यात विजयकुमार बनसोडे, तुषार शिंदे,चंद्रकांत माने यांनी गायक केले.
मृदंग साथ हरी ओम पाटील कुरनूरकर, गोविंद चव्हाण (चुंगी) यांनी दिली.चि.नरेंद्र पाटील व आदिनाथ पाटील, श्रीहरी पाटील या बाल कलाकारांनी गायन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.या कीर्तन सोहळ्याला ह.भ.प श्रीरंग महाराज औसेकर यांच्यासह परिसरातील महाराज मंडळी आणि कुरनूर पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆ २५ दिंड्या सहभागी

या किर्तन सोहळ्यासाठी काटगाव, चव्हाणवाडी, खानापूर, हिप्परगाताड, इटकळ, केरूर, बाभळगाव, येडोळा, हाळ वागदरी, शहापुर, किणी, गुळहळळी, दहिटणे, सुलतानपूर, चुंगी, किणीवाडी, बोरगाव दे,मोट्याळ परिसरातून २५ दिंड्या सहभागी झाल्या होत्या.प्रचंड थंडी असूनही महाराजांच्या किर्तन सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!