---Advertisement---

ऊसतोड कामगारांसह सर्वांनाच कोरोनाची लस टोचली ;जयहिंद शुगरकडून तिसऱ्या लाटेपूर्वी खबरदारी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर व आरोग्य विभाग,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना स्थळावर मोफत कोरोना लसीकरण मोहीम पार पडली.

चेअरमन गणेश माने देशमुख व मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विशेषकरून सर्व कर्मचारी,ऊस वाहतुक ड्रायव्हर,हंगामी ठेकेदार कामगार,ऊस तोडणी कामगार यांच्यासाठी मोफत लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी
व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, कार्यकारी अधिकारी मोहन पिसे,ऊस विकास अधिकारी दत्तात्रय तोरणे, एच. आर. मॅनेजर डी.बी. बळवंतराव,आरोग्य सहाय्यक जाधव पी.एम,सतारवाले एस.एस,मंदोडीकर एस.आर,सगर एन.एस,राऊत, व्ही.डी,सलगरे सी.एस,ममता नकाते, प्रियंका गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!