उमरगा, ता. ११ : केसरजवळगा, ता. उमरगा येथील सुपुत्र मेजर महेशकुमार भुरे यांना देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी शौर्यचक्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात मेजर भुरे यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंदराव भुरे, श्रीमंत भुरे, विठ्ठल साईचे संचालक संगमेश्वर घाळे, प्राचार्य दिलीप गरुड, अशोक सपाटे, व्हणशेटप्पा मुलगे, हल्लाप्पा कोकणे, गोविंद पाटील, रमेश मुलगे, कल्याणी मुलगे, अँड. पाशा इनामदार, सरपंच महानंद कलशेट्टी, अजिज शेख, बसवराज पाटील, श्रीशैल भुरे, श्रीधर खज्जे, उमेश भुरे, शंकर चिंचोरे, सिद्धेश्वर पाटील, पंडित भुरे, काशिनाथ भुरे, ओमकार जामगे, नदीम शेख, प्रकाश भुरे, श्रीशैल्य स्वामी, सिद्धाराम स्वामी, रवींद्र ख्याडे, प्रमोद कुलकर्णी, अभिजीत घाळे आदींची उपस्थिती होती.