वॉशिंग्टन : वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेमध्ये एका व्यक्तीमध्ये चक्क डुकराचे हृदय बसविण्यात डॉक्टरांना मोठं यश आले आहे. ही शस्त्रक्रिया ५७ वर्षाच्या पुरुषावर करण्यात आली आहे.
विज्ञान क्षेत्राला हे खूप मोठं यश आले असल्याचे सांगितले जातं आहे. तसेच हा जागतिक दर्जाचा इतिहास या डॉक्टरांनी नोंद केला आहे. UOMSOM या स्कूलने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सदर रुग्णाचे नाव डेविड बेनेट असे आहे. तो अमेरिकेतील एका शहरातील रहिवासी आहे. त्याच्यावर हृदय प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आणि विशेष म्हणजे हे हृदय डुकराचे आहे. त्यामुळे मानवी शरीरात प्रण्याचे हृदय धडकणार आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.