ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱया विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज शुक्रवार, दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी माननीय वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. असलम शेख, माननीय पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुंबईच्या माननीय महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच मा. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) श्री. शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित राहतील.

कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, सदर कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार आहे. त्‍याचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या यू ट्यूब चॅनल (MyBMC My Mumbai) वर पाहता येईल. त्‍याची लिंक सोबत दिली आहे. https://bit.ly/BMCWhatsAppChatBotLaunch

महानगरपालिकेचे ट्व‍िटर हॅंडल @mybmc आणि फेसबूक अकाऊंट MyBmc वर देखील हे प्रक्षेपण पाहता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!