---Advertisement---

उजनी धरणात दोघेजण बुडाले, करमाळा तालुक्यातील घटना; एकाचा मृतदेह सापडला

Follow Us:
---Advertisement---

सोलापुर : होडीतून फिरण्यासाठी गेलेले दोनजण उजनी धरणात बुडाले असून, एकाचा मृतदेह सापडला आहे. रात्री उशिरा पर्यंत दुसऱ्याचा शोध सुरु होता. शुक्रवारी सकाळी साडे अकारा वाजता ही घटना करमाळा तालुक्यातील तालुक्यातील चिकलठाणजवळील उजनी जलाशयाच्या परिसरात घडली. अल्ताफ इकबाल शेख वय १८, असे मृताचे नाव असून, समीर याकूब सय्यद वय २९ या मच्छीमार तरुणाचा शोध सुरू होता.

चिखलठाण येथील समीर सय्यद यांचा उजनी धरणात मासेमारीचा व्यावसाय आहे. त्यांच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असत, मुंबई येथील पाहुणे त्यांच्या सोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातील पाण्यात फेरफटका मारताना अल्ताफ शेख याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी समीरने पाण्यात उडी मारली. समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहोणारा होता. मात्र, अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

होडीतील इतरांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला मासेमारी करणारे मच्छीमार आले. त्यांनी शोध सुरू केला. घटनास्थळ गावापासून जवळच असल्याने गावातील लोक मोठय़ा प्रमाणावर जमले. या परिसरातील दहीगाव, चिखलठाण, केडगाव, कुगाव परिसरातील मच्छीमार येऊन दोघांचा शोध घेत होते. या मच्छीमारांच्या गळाला अल्ताफचा मृतदेह लागला. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!