ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२३ : दिवंगत आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथे मंगळवार दि. २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी दिली.

अक्कलकोट नवीन राजवाडा समोर बसव निवास येथे सकाळी १० ते ३ पर्यंत हे सर्व कार्यक्रम स्व. जनसेवक आमदार बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत. यात मोफत आरोग्य शिबिर, १५ वर्षेवरील लोकांना लसीकरण, रक्तदान शिबीर,बालचिकित्सा, नेत्र, दंत शिबिर होणार असून सहभागी नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

यावेळी बालरोग तज्ञ डॉ. दिपक पाटील, नेत्रतज्ञ डॉ. अश्विनी अभिवंत, एमडी मेडिसीन डॉ. वीरभद्र स्वामी, दंत स्पेशालिस्ट डॉ. विवेक करपे, डॉ. मनिषा पाटील आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. आरोग्य शिबीर व दंत तपासणी हे समर्थ डेंटल स्पेशालिस्ट क्लिनिक शिवछत्रपती व्यापारी संकुल कांदा बजार येथे पार पडणार आहे.तरी तालुक्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तानवडे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, नगराध्यक्षा शोभा खेडगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, पंचायत समिती सभापती आनंदराव  सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, राजशेखर मसुती, महेश हिंडोळे, प्रभाकर मजगे, बसलिंगप्पा खेडगी, बाळासाहेब मोरे, आशपाक बळोरगी, सुनिल बंडगर, उत्तम गायकवाड, तुकाराम बिराजदार, गुंडप्पा पोमाजी,शिवशरण वाले, परमेश्वर यादवाड, अविनाश मडिखांबे, शिवसिध्द बुळ्ळा, चंद्रकांत इंगळे, राजेंद्र बंदिछोडे, अरविंद ममदाबाद, सिध्दाराम मठपती, दयानंद उबरजे, विश्वनाथ भरमशेट्टी, परमेश्वर अरबाळे, सिध्दार्थ गायकवाड आदी गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!