---Advertisement---

राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये २५ अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील कमाल आणि किमान तापमानत घट राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!