ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातोश्री लक्ष्मी शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा; चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांची माहिती

अक्कलकोट, दि.२९ : रूद्देवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २००० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दास अनुसरून कारखान्याकडून बिल वेळेवर अदा करण्यात आले आहे.मातोश्री लक्ष्मी शुगरकडून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात.मागील वर्षी थोडीशी बिले अदा करण्यात अडचणी आल्या होत्या.परंतु यावर मात करत यंदाच्या गळीत हंगामास सामोरे जावे लागले. यावर्षीही दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस बिल अदा केल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, कारखान्याचे तज्ञ संचालक शिवराज म्हेत्रे, दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,  डॉ. उदय म्हेत्रे, शेती विभाग मुख्य मार्गदर्शक गुरुनाथ लोहार, वर्क मॅनेजर रावसाहेब गदादे, केन मॅनेजर खंडेराया व्हसुरे, प्रोडक्शन मॅनेजर प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहू

यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. मागील वर्ष शेतकऱ्यांचे बिलासाठी आंदोलन झाले. तरीही शेतकऱ्यांनी मागील सात वर्षांचा चोख व्यवहार पाहून ऊस पुरवठा केला आहे.  शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखान्याची वाटचाल सुरळीतपणे सुरू आहे – सिद्धाराम म्हेत्रे, चेअरमन तथा माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!