सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघार घेत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण गेले होते.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी भाजपचे आमादार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला. मात्र, सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशानुसार आ. नितेश राणे यांना ६ फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नसल्याने आ. राणे मंगळवारी घरी जाऊ शकले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आ. नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांनी दाद न मागता अर्ज माघार घेतला होता.
दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे असे ते यावेळी म्हणाले.