---Advertisement---

ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, भाजप विरोधात सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याच आवाहन

Follow Us:
---Advertisement---

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. जर आपण पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करू शकलो तर राष्ट्रीय स्तरावरही आपण भाजपचा पराभव करू शकतो, असे सांगत भाजपविरोधात सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याच आवाहन त्यांनी केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली.

ममता बॅनर्जी यांनी १९९८ साली काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी तृणमूलची स्थापनाकेली. तेव्हा पासून आता पर्यंत त्याच पक्षाच्या अध्यक्षा आहेत. २०११ साली डाव्या पक्षांना मात देऊन त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत केली होती. केंद्रातील सत्ताधारी भाजपला पराभूत करायचे असेल तर देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे. २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढवावी, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केले.

आमच्याकडे आता दोन वर्षे आहेत. या काळात आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार आहे. २०२४ सालच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ पैकी ४२ जागा या तृणमूलच्या पारडय़ात पडतील यासाठी आपला पक्ष प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या सत्ता काळात राजकारणाचे स्वरूप बदलले असून त्यास जोरदार प्रत्युत्तर देण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.

आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची तयारी केली असून त्याची सुरुवात गोव्या पासून होत आहे. आपला पक्ष उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत नाही. पण येत्या ८ फेब्रुवारी रोजी अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी प्रचाराला जाणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!